लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती साजरी

Foto
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सर्वपक्षीय जिल्हा उत्सव समितीच्या वतीने आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विविध सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आ.अंबादास दानवे, माजी आ. कल्याण काळे, संजय केनेकर, संजय ठोकळ, दौलत खरात, प्रशांत शेगावकर, श्रावण गायकवाड यांच्या हस्ते आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर गरजु लोकांना खिचडीचे वाटप करण्यात आली. यावेळी अन्नदानावर जनजागृती केली. तसेच याप्रसंगी आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा. याशिवाय मुबंई या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे. अशी मागणी करण्यात आली. यावेळी विलास सौदागर, कमलेश चांदणे, लक्ष्मीकांत पिंपळे, महेंद्र मानवतकर, लखन मानवतकर, पांडुरंग सोनवणे, आंबादास हिवाळे, संदीप वाघमारे, किशोर आव्हाड, किशोर नाडे, सचिन खाटे, अजित राजहंस, भारत अवचार सह समितीच्या आदी सदस्यांनी सहकार्य केले.